आयुष्य भर सोबत आसून
जवळ कधी बसत नाही.......
घरात राहून आम्ही
एकमेकांना दिसत नाही.......
हरवला तो आपसातला
प्रेम जिव्हाळाचा संवाद.......
ऐकमेकाश दोश देऊन
नित्य चालले वादी वाद.......
धाव धाव धावतो आहे
दिशा मात्र कळत नाही.......
हृदयाचे पाऊल कधी
हृदयाकडे वळत नाही.......
इतकं जगून झालं पण
जगायला वेळ भेटलीच नाही.......
जगतो आहे कशासाठी
काहीच कसला मेळ नाही.......
एक क्षण येईल असा
घेऊन जाईल हा श्वास.......
अर्ध्यावरच थांबलेला
असेल जीवन प्रवास....... अजूनही वेळ आहे
थोड तरी जगून घ्या.......
सुंदर अश्या जगण्याला
मन भरून सोस्त जगून घ्या.......
0 Comments