माझ्या आठवणीतलं गाव
हृदयात घर करून बसलेलं
कोटंबी माझं गाव.......!!!
आकाशाच्या छताखाली आनंद चादण्याचा
नदी डोंगर आणि हिरवाईचा
उरल या मनात एकच नाव
माझ्या आठवणीतलं गाव
हृदयात घर करून बसलेलं
कोटंबी माझं गाव.......!!!
मुसळधार पाऊस आणि नदीच पुर
घुंगवणारी वाहाठ आणि भरून येणारे उन
मी तिथे जन्मलो वाढलो तो गाव
माझ्या आठवणीतलं गाव
हृदयात घर करून बसलेलं
कोटंबी माझं गाव........!!!
लहानपणी मी नेहमी डुबत राहिलो
वडाच्या झाडावर सूर पारंब्या चा खेळ खेळत राहिलो राहिलो
मनाचा नेहमी घेतो ठाव
माझ्या आठवणीतलं गाव
हृदयात घर करून बसलेलं
कोटंबी माझं गाव.........!!!
मी शाळेमधून घरी आलो होतो
रस्त्यावरची शिवाजी महाराजांच्या काळातील पिंपळाचे झाडे तोडून टाकली होती
संध्याकाळी पिंपळावरती पक्षी बसत नाही
नेहमी सारखी कावळे आता काव काव करत नाही
बागेकडे गेलेल्या पाऊल वाटे वर आत्ता झाडे दिसत नाही
आषाढी येतील मोरासारखा सम्रात नाचत राहतील
माझ्या आठवणीतलं गाव
हृदयात घर करून बसलेलं
कोटंबी माझं गाव......!!!
( प्रमोद बदादे )

0 Comments